उस्मानाबाद ,दि.२० : 

पोलीस ठाणे, परंडा: भागवत सुदाम बांगर, रा. तांबेवाडी, ता. भुम हे दि. 16- 17.06.2021 दरम्यानच्या रात्री गावातील आपल्या स्वस्त धान्य दुकानासमोर झोपले होते. दरम्यान त्यांनी उषाला ठेवलेलेल्या विजारीच्या खिशातील 36,000 ₹ रोख रक्कम व धान्य वाटप करण्याची पंचिंग मशीन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भागवत बांगर यांनी दि. 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, येरमाळा: दिलीप वचिष्ट गोडगे, रा पिस्तामवाडी, ता. परंडा यांनी आपली मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 4270 ही दि. 13 जून रोजी 19.30 वा. सु. रत्नापुर शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगतच्या ‘बांगर बंधु हॉटेल’ समोर लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिलीप गोडगे यांनी दि. 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top