उस्मानाबाद ,दि.२० :
उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एक 24 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 12 जून रोजी 14.00 वा. सु. शेतात जात असतांना गावातीलच तीन युवकांनी त्या तरुणीस बळजबरीने मोटारसायकलवर बसवून शेत शिवारात नेउन दोन तरुणांनी तीच्यावर लैंगीक अत्याचार केले तर उर्वरीत एका तरुणाने त्या दोघांना लैगीक अत्याचार करण्यास प्रोत्साहीत केले. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास त्या तरुणीस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दि. 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 366, 376 (ड), 506, 114, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“विनयभंग.”
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील एका तरुणाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या विवाहीत महिलेशी व तीच्या बहिनीशी ओळख करुन त्यांच्या समवेत वेळोवेळी छायाचित्रे काढली. कालांतराने त्याने त्या महिलीच्या बहिनीच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढून त्या खात्यावरुन त्या दोघीं सोबतची छायाचित्रे आपली प्रेयसी आहे असे भासवून प्रसिध्द केली तसेच त्या महिलेच्या भावासही पाठवून त्या महिलेचा विनयभंग केला. यावरुन संबंधीत महिलेने दि. 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 (क) (ड) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.