उस्मानाबाद ,दि.२० 

पोलीस ठाणे, कळंब: बसवराज रामलिंग सोनटक्के, रा. हासेगाव (के.), ता. कळंब हे दि. 19 जून रोजी 14.00 वा. सु. हासेगाव गट क्र. 227 मधील आपल्या शेतात होते. यावेळी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन 1)राजेंद्र विभुते 2)बालासाहेब विभुते 3)रावसाहेब विभुते, तीघे रा. भालगाव, ता. केज 4)ओमकार सोनटक्के 5)शिवाजी सोनटक्के 6)अनिता सोनटक्के, तीघे रा. औरंगाबाद 7)प्रमिला गुळवे, रा. वडगाव (यु.), ता. केज 8)नामदेव खरटकर, रा. हासेगाव (के.) या सर्वांनी संगनमताने बसवराज सोनटक्के यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बसवराज सोनटक्के यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: सिध्देश्वर सोमनाथ पळसे, रा. एकुरगा, ता. उमरगा हे दि. 19 जून रोजी 18.00 वा. सु. पत्नीसह आपल्या घरी होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- प्रविण कोळी, प्रशांत कोळी, मंगलाबाई कोळी या तीघांनी सिध्देश्वर पळसे यांच्या घरात घुसून पळसे पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिध्देश्वर पळसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top