तुळजापूर, दि. २२
शहरातील वासूदेव नगर येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विजय कंदले यांच्या हस्ते स्मार्ट लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थित नगरसेवक पंडितराव जगदाळे, किशोर साठे ,चंद्रकांत कणे, माजी नगरसेवक अविनाश गंगणे ,सुहास साळुंके, माऊली भोसले, शांताराम पेंदे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, युसुफ शेख, रशीद सय्यद, मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर, तुकाराम मोटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंचला बोडके, डॉ. कमठाणे, सुलक्षणा मोरे, खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी एकूण 101 जणांना लस देण्यात आली. राणाजगजितसिंह पाटील यांनी आदर्श लसीकरण केंद्र तुळजापूर येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 व वार्ड क्रमांक 6 व 9 हे केल्याबद्दल कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. याच कार्यक्रमात नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदरील लसीकरण केंद्रास मुख्याधिकारी आशिष लोकरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंचला बोडके श्रीधर, डॉ. श्रीधर जाधव यांनी सदिच्छा भेट दिले.
या कार्यक्रम प्रसंगी नगर परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सातपुते तसेच शाळेतील माजी विद्यार्थिनी कु.गार्गी कावरे ,कु.सायली जाधव ,कु.श्रावणी कंदले उपस्थित होते.
सूत्रसंचालन महेंद्र कावरे यांनी तर आभार आनंद कंदले यांनी मानले.
याच कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी व आनंद कंदले, यांचा कोव्हिड च्या काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लसीकरण पूर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षक, गणेश रोचकरी , महेंद्र पाटील ,सुरजमल शेटे, श्रीमती गिराम एस बी, लोहारे के.ए , निडवंचे व्ही ए., गुळवे, विश्वजीत कदम, जाधव एस बी, रोचकरी एम बी, माने शालन ,गाडे बेबी , शिवाजी डाके, सिंधू साळुंखे, नंदा गाडे सर्व शिक्षक व न प कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील प्रकाश हिरेपट परिचारिका उषा कोकणे , सी.एम. मसदुत , बळीराम करडे यांनी परिश्रम घेतले.