उस्मानाबाद, दि.22

 कोरोना महमारीच्या विळख्यामुळे अनेक कुटुंबाचा आर्थिक  स्त्रोत बंद पडल्यामुळे अनेक कुटुंबाला मुलभुत गरजा  आवश्यक  असल्याने  उद्योजक  सचिन  शिंदे व माजी नगरसेवक  विशाल  साखरे,  गिरिश पाळणे व  संतोष शहा यानी सामाजिक  बांधिलकी म्हणून  गरजू कुटुंबाना दोन महीने पुरेल एवढे किराणा साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. 


सदरील चाळीस कीट या घरपोच वाटप करण्यात आले. तसेच सदरील कार्यक्रमात  शामसुंदर बोरा यांनी वैयक्तिक तिन आँक्सिजन मशीन खरेदी करून मोफत लोकांचे प्राण वाचविण्यासाठी दिल्या बद्दल त्यांचा सत्कार सौ. पुष्पा शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आला. तसेच दुरदर्शन इलेक्ट्रॉनिकचे मालक सत्तार  शेख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त  सत्कार   सचिन शिंदे , विशाल साखरे , सुजित साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आकाश लश्करे यानी कीट वटपासाठी केलेल्या मदतीबद्द्ल सत्कार करण्यात आला.  

यावेळी कार्यक्रमात   शामसुंदर  बोरा , कैलास पानसे,  प्रभाकर साखरे  ,   खुद्दुस मोमीन,  मोहम्मद इदरिस, अथर हुसेनी ,  दिलीप महामुनी,  अभय पाटिल  तसेच समता नगर येथील महिला  ,सौ. कमल साखरे, सौ.वर्षा जोशी ,सौ. मंजुषा साखरे, श्रीमती सुमन बेगमपुरे ,श्रीमती विमल कोरे,  आदी उपस्थित होते. .
 
Top