नळदुर्ग, दि. ५ :
हगलूर ता. तुळजापूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने शनिवार  दि. ५ जुन रोजी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर भविष्यात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


एक घर-एक झाड मोहीम राबविणार आहे आणि पुढील काही वर्षात 1000 झाडे लावण्याचा निर्धार केला आहे . यावेळी सरपंच  जयपाल पाटील, उपसरपंच  महेश गवळी, माजी सरपंच नालंदा पाटील, शिरीष शिवाजी घुगे, रोजगार सेवक जयकुमार घुगे, ग्रामसेवक ए एम कदम,  संगणक ऑपरेटर खामदेव घुगे, शिपाई दिनकर गवळी  यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top