उस्मानाबाद,दि.५ : उस्मानाबाद पोलीसांनी काल शुक्रवार दि. 04 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 5 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवले आहेत.
(1) सुरेश मानु राठोड, रा. बेळंबतांडा, ता. उमरगा हे बेळंब येथील आलुर रस्त्यालगतच्या शेतात एका कॅनमध्ये 9 लि. गावठी दारु (किं.अं. 940 ₹) बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
(2) सुनिल दशरथ कदम, रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हे गावातील महाळंगी रस्त्यालगतच्या एका टपरीमागे कापडी पिशवीत अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600 ₹) बाळगलेले तर प्रभु गणपती राठोड, रा. समुद्रवाणी तांडा, ता. उस्मानाबाद हे पाडोळी शिवारातील ‘आर्यन ढाबा’ येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600 ₹) बाळगलेले असलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
(3) सुमन माणीक राठोड, रा. जहागीरवाडी, ता. उस्मानाबाद या गडदेवदरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या आपल्या पत्रा शेडसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या व 45 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 3,600 ₹) बाळगलेल्या असलेल्या उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
(4) व्यंकट बाबुराव गायकवाड, रा. गुरुवाडी, ता. उमरगा हे गुरुवाडी येथील आपल्या शेतात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 720 ₹) बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.