तुळजापूर दि २१ :
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी तुळजापूर तालुका युवक कार्यकर्ते विवेक शिंदे यांची जिल्हाध्यक्ष आदित्य कोरे यांनी निवड केली आहे. निवडीनंतर कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, तुळजापूर युवक शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, शहर कार्याध्यक्ष गोरख पवार, माजी तालुका युवक अध्यक्ष महेश चोपदार,युवक नेते अण्णा शिरसागर या निवडीनंतर अभिनंदन केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वेगवेगळ्या नियुक्त्या दिल्या जात आहेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने विवेक शिंदे यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार दिला आहे.