वागदरी, दि.२१ एस.के.गायकवाड
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून या लसीकरणास वागदरी ता.तुळजापूर
येथील ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. यशवंत नरवडे ,आरोग्य सेविका संगीता गायकवाड, आरोग्य कर्मचारी एस.जे.उकीरडे, पी.आर.कुलकर्णी, आर.एन.पवार, आदींनी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार ,उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे,ग्रामसेवक जी.आर.जमादार, ग्रा.प.चे संगणक परिचारक आनंद गायकवाड,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, रावसाहेब वाघमारे, विद्या बिराजदार,पत्रकार किशोर धुमाळ आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.२१ जून रोजी जि.प. प्राथमिक शाळा वागदरी ता. तुळजापूर येथिल लसीकरण केंद्रात सकाळी ८ वाजता लसीकरणास सुरुवात केली असता येथील ग्रामस्थानी या लसीकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद देत किमान शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करत तब्बल १६० व्यक्तीनी लस टोचून घेतली.
याकामी मुख्याध्यापिका महादेवी जते,सहशिक्षिका एस.एस.सांगळे ,एम.आर.चौधरी, आर.पी.साखरे सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनी पवार, मदतनीस रुपाली जाधव आदींनी सहकार्य केले.