पोलीस ठाणे, उमरगा: उमरगा येथील कालिंदा बालाजी घोडके यांसह त्यांचे 3 कुटूंबीय व अनुसया गिरजप्पा घोडके यांसह त्यांचे 3 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा दि. 16 जून रोजी 16.30 ते 17.00 वा. चे दरम्यान उमरगा गट क्र. 343 / 02 मधील शेतात शेतजमीनीच्या कारणावरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कालिंदा घोडके व अनुसया घोडके या दोघींनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, आनंदनगर: सांजा, ता. उस्मानाबाद येथील दिलीप रामभाऊ मोहिते यांसह त्यांचे 7 कुटूंबीय व चंद्रकला रुपसेन मोहिते यांसह त्यांचे 4 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा दि. 15 जून रोजी 13.00 वा. सु. सांजा शेत शिवारात शेतातील बांधाच्या वाटणीवरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप मोहिते व चंद्रकला मोहिते या दोघींनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.