उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एका तरुणाने गावातीलच 20 वर्षीय प्रेयसीला (नाव- गाव गोपनीय) विवाहाचे आमिष दाखवून तीच्या सोबत गेल्या एक वर्षभर लैंगीक संबंध ठेउन नंतर लग्नास नकार दिला. या नंतर त्या तरुणीचा विवाह अन्य तरुणाशी निश्चित झाला असता त्या प्रियकरासह त्याच्या कुटूंबीयांनी, “तुझ्या भावी पतीस या प्रेमसंबंधांची माहिती देउन तुझे लग्न मोडतो.” अशी धमकी त्या तरुणीस देउन, शिवीगाळ करुन, तीला ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या संबंधीत प्रेयसीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एका 23 वर्षीय युवतीचा (नाव- गाव गोपनीय) महिनाभरापुर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर मधुचंद्राच्या रात्री समागमा दरम्यान पत्नीच्या जननेंद्रीयातून रक्तस्त्राव न झाल्याने तीचे कौमार्य विवाहापुर्वीच भंग झाले आहे असा संशय तीच्या पतीने व्यक्त केला. या कारणावरुन तसेच त्या नवविवाहितेने माहेराहुन पैसे आणावेत अशा कारणांसाठी पती, सासु- सासरे यांसह सासरकडील 8 लोक तीचा शारिरीक- मानसिक छळ करु लागले. अशा मजकुराच्या संबंधीत विवाहितेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 498 (अ), 109, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top