पोलीस ठाणे, नळदुर्ग: ज्ञानेश्वर अंबादास आसापुरे, रा. सोलापूर यांनी दि. 02 जून रोजी 19.00 वा. सु. ईटकळ येथील धायफुले गिरणीजवळ निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून मोटारसायकल समोरुन येणाऱ्या मो.सा. वर आदळली. या अपघातात आसापुरे यांच्या मो.सा. वर पाठीमागे बसलेले इब्राहीम मलीक नदाफ, रा. सोलापूर (द.) यांसह समोरील मो.सा. चालक- रविंद्र मधुकर पाटील हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या चाँद महेबुब नदाफ यांनी दि. 16 जून रोजी चौकशी दरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तुळजापूर: अशोक शंकर नलगे, रा. विकासवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापुर यांनी दि. 15 जून रोजी 14.30 वा. सु. सिंदफळ येथील पर्यायी मार्गाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रक क्र. एम.एच. 09 सीए 0669 ही निष्काळजीपने चालवून स्विफ्ट कार क्र. एम.एच. 14 इयु 9400 ला डाव्या बाजूने धडक दिली. या अपघातात कारमधील अशोक श्रीरंग दरक, रा. पुणे यांसह श्रीरंग दरक, प्रिती दरक व संगीता करवा असे चौघे जखमी झाले. अशा मजकुराच्या अशोक श्रीरंग दरक यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

 
Top