पोलीस ठाणे, आनंदनगर: उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्रशालेल्या ईमारतीमधील स्टोअर रुमचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 09- 14.06.2021 रोजी दरम्यान तोडून आतील दिव्यांगासाठीचे साहित्य व शिक्षकांचे गोपनिय अहवाल चोरुन नेले. अशा मजकुराच्या उस्मानाबाद पंचायत समितीचे कनिष्ट सहायक- सोमनाथ भगवान काळे यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, शिराढोन: अशोक वामनराव गणगे, रा. तांदुळजा, ता. लातुर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16 जून रोजीच्या मद्यरात्री तोडून आतील कपाटातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 6,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक गणगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या प्रत्येकी 30 कि.ग्रॅ. वजनाच्या दोन पिशव्या ग्राम-झिन्नर, ता. वाशी येथील बालाजी महारुद्र वाघमारे व रामा हरिदास वाघमारे यांनी 14 जून रोजी 11.00 वा. झिन्नर येथून चोरी केल्या. अशा मजकुराच्या कृषी विभाग कर्मचारी- बाळासाहेब वामन डोईफोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.