पोलीस ठाणे, कळंब: सुनिल हरीदास क्षिरसागर, रा. इंदीरानगर, कळंब यांनी विक्रीच्या उद्देशाने आपल्या घरात महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटखा बाळगला आहे. अशा गोपनीय खबरेवरुन अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्या पथकाने दि. 15.06.2021 रोजी 14.30 वा. सु. त्यांच्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी 1,38,657 ₹ किंमतीचा गुटखा, पानमसाला पथकास आढळला. यावरुन अन्नसुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी दि. 16 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top