उस्मानाबाद,दि.१७:
पोलीस ठाणे, तुळजापूर: कार्तीक ज्ञानोबा चव्हाण, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 16 जून रोजी गावातील आपल्या पत्रा शेड समोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.