उस्मानाबाद दि. १७:
पोलीस ठाणे, आनंदनगर: रत्नाकर धनके, रा. समर्थनगर, उस्मानाबाद व कृष्णा सोनटक्के, रा. बेंबळी या दोघांचे स्मार्टफोन हरवल्याने आनंदनगर पो.ठा. येथे दोन गहाळ प्रकरणे दोन महिन्यांपुर्वी नोंदवण्यात आली होती.
आनंदनगर पोलीसांनी तांत्रीक तपास केला असता हे दोन स्मार्टफोन अन्य व्यक्ती वापरत असल्याचे निदर्शनास येताच सपोनि- श्री. दिनकर गोरे यांच्या पथकाने त्या व्यक्तींकडून ते स्मार्टफोन जप्त केले होते.
आज दि. 17 जून रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मोतीचंद राठोड व आनंदनगर पो.ठा. चे प्रभारी अधिकारी- श्री सतीष चव्हाण यांच्या हस्ते नमूद दोन्ही स्मार्टफोन मुळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले स्मार्टफोन परत मिळाल्याने धनके व सोनटक्के यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले. “हरवलेले मोबाईल फोन त्रयस्थ व्यक्तीस सापडल्यास त्यांचा वापर न करता ते संबंधीत परिसरातील पोलीस ठाण्यात जमा करावेत. जेणेकरुन ते फोन मुळ मालकांना परत करता येतील. सापडलेले फोन मुळ मालकाच्या संमतीविना वापरणे गैर असुन त्या फोनचा वापर केल्यास प्रसंगी गुन्हा दाखल होउ शकतो.” असे आवाहन मा. उप वि. पो. अ. श्री. मोतीचंद राठोड यांनी जनतेस केले आहे.