उस्मानाबाद,दि.17 :

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे उद्या दि.18 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.त्याचा दौरा पुढील प्रमाणे-

      श्री.टोपे यांचे शासकीय विमानाने सकाळी 7.50 वा औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार असून अंकुशनगर,बीड मार्गे शासकीय वाहनाने दुपारी 12.45 वा गिरोली (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार असून 1.45 वाजेनंतर त्यांचे गिरोली येथून उस्मानाबादकडे प्रस्थान होणार आहे.दुपारी 2.45 वा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होणार असून दुपारी 3.00 वा कोरोना आढावा आणि खरीप हंगाम बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

   सायंकाळी 5.15 वा शासकीय वाहनाने जालन्याकडे प्रयाण करणार आहेत.

 
Top