तुळजापूर ,दि .२५: 

उस्मानाबाद तालुक्यातील वाडी,बामनी येथील शेतकऱ्यांना  शेतातमध्ये ये  जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.  शेत रस्त्याबाबत महसूल स्तरावर शेतरस्ता मंडळ अधिकारी व्हि .व्हि . काळे, तलाठी अमोल निरफळ यांनी स्वतः जागेवर जावुन निकाली काढुन हा शेतरस्ता मोकळा करून दिला. 

दि. २४ जुन रोजी एक शेतरस्ता अंदाजे १ कि.मी अंतर  गट नंबर ३६० व ३६१ मधुन जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या आपसातील तक्रारीतुन बंद होता. तो मंडळ अधिकारी  व्हि .व्हि . काळे , तलाठी अमोल निरफळ, सरपंच भारत रामा झोंबाडे ,पोलीस पाटील सुरवसे  तसेच शेतकरी श्रीमंत रामचंद्र मोटे ,. बाळासाहेब रघुनाथ नरवडे, हनुमंत विठल मोटे ग्रामस्थ   उपस्थित होते.
 
Top