वागदरी ,दि.२५:एस.के.गायकवाड

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि संघर्ष नायक ना. रामदास  आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाच्या शाखेचे सिध्दार्थनगर तुळजापूर येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या हस्ते तर जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,शहराध्यक्ष अरुण कदम,युवा आघाडी शहराध्यक्ष अमोल कदम ,प्रताप कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.

    
याप्रसंगी निवडण्यात आलेली शाखा कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
शाखाध्यक्ष अनिकेत सोनवणे, उपाध्यक्ष साहील सुरवसे, अआमीत कदम,कार्याध्यक्ष नितीन बाबरे, सक्रेटरी अजय सोनवणे, सहसचिव गोरख कदम ,आत्माराम सोनवणे, संपर्क प्रमुख सोमनाथ सोनवणे, संघटक विश्वजीत सोनवणे, संरक्षण प्रमुख आभिजीत सोनवणे, सल्लागार महादेव सोनवणे, तानाजी ढावरे,कुमार चौधरी, भैरव कदम हणमंत सोनवणे आदींची निवड करण्यात आली. 


सर्व नुतन पदाधिकारी यांचे ,रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस. के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के आदींनी  आभिनंदन केले. यावेळी रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top