उस्मानाबाद,दि.४:

 पोलीस ठाणे, परंडा: समाधान येडबा कातुरे व रामभाऊ चौधरी, दोघे रा. जवळा (नि.), ता. परंडा हे दोघे दि. 02 जून रोजी गावातील इडा रस्त्याच्या बाजूला अनुक्रमे देशी दारुच्या 13 व 12 बाटल्या (किं.अं. 1,750₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, लोहारा: गौतम तात्याराव भंडारे, रा. कास्ती (बु.), ता. लोहारा हे दि. 03 जून रोजी आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) बाळगलेले तर याच दिवशी शिवशंकर सिद्राम व्हर्टे, रा. जेवळी, ता. लोहारा हे गावातील चरण कमल ढाब्यासमोर देशी दारुच्या10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) आणि शिवराज मधुकर कर्ले, रा. विलासपुर (पां.), ता. लोहारा हे गावातील एका शेतात देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 840 ₹) अवैधपणे बाळगलेले असलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, मुरुम: खासीम करीमोद्दीन शेख, रा. बेळंब, ता. उमरगा हे दि. 03 जून रोजी गावातील केसरजवळगा रस्त्यालगतच्या एका पत्रा शेडसमोर अवैध विक्रीच्या उद्देशने देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 720 ₹) बाळगलेले असलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top