उस्मानाबाद, दि.४

 जिल्हा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारीकेलेल्या विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1)संजय मनोहरराव रुद्रवार 2)मोसीन मुस्तफा हानुरे, दोघे रा. उमरगा या दोघांनी दि. 03 जून रोजी 10.30 ते 11.00 वा. दरम्यान उमरगा येथील अनुक्रमे ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ व ‘सिटी मोबाईल शॉपी’ ही दुकाने व्यवसायास चालू ठेवली असल्याचे उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 3)जिलानी मेहबुबखॉ पठाण, रा. परंडा यांनी याच दिवशी परंडा येथील आपले ‘मिलन हॉटेल’ व्यवसायास चालू ठेवले असल्याचे परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            अशा प्रकारे नमूद तीघांनी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश डावलून व कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top