उस्मानाबाद,दि.४
पोलीस ठाणे, कळंब: 1)सर्जेराव तात्या शिंदे, वय 52 वर्षे 2)मुरलीधर साहेब शिंदे 3)सुरेश साहेब शिंदे, तीघे रा. महादेव नगर पारधी पिढी, कोठाळवाडी, ता. कळंब हे तीघे दि. 01 जून रोजी 19.30 वा. सु. प्रवासादरम्यान खोदला फाटा चौकात रस्त्याकडेला लघुशंकेस थांबले होते.
यावेळी अज्ञात चालकाने सुझुकी स्विफ्ट कार क्र. एम.एच. 14 जीयु 1308 ही निष्काळजीपणे चालवून त्या तीघांना धडक दिली. या अपघातात सर्जेराव शिंदे हे मयत झाले तर मुरलीधर व सुरेश हे दोघे गंभीर जखमी केले. या अपघातानंतर नमूद कारच्या अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या पवान राजेंद्र शिंदे, रा. महादेव नगर पारधी पिढी, कोठावळी यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.