उस्मानाबाद,दि.४ 

पोलीस ठाणे, ढोकी: महेश बाबुराव नाईकवाडी, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांच्या तेर गट क्र. 1235 मधील शेतातील 11 पत्रे दि. 01- 02.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महेश नाईकवाडी यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): धनंजय अनिल तनमोर, रा. भानुनगर, उस्मानाबाद यांची हिरो पॅशन प्रो, मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 6707 ही दि. 10.05.2021 रोजी 11.00 ते 11.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धनंजय तनमोर यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


            दुसऱ्या घटनेत तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील जिल्हा कृत्रीम रेतन केंद्रातील खोलीचा कडी- कोयंडा दि. 27.05.2021 ते 03.06.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून आतील ॲल्युमिनीअम धातुचे 60,000 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र अधिकारी- अभिजीत महादेवराव इंगळे यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top