उस्मानाबाद,दि.६ :
पोलीस ठाणे, कळंब: मछिंद्र छगन काळे, वय 45 वर्षे, रा. फरीदनगर, कळंब हे दि. 05 जून रोजी 02.04 वा. सु. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथील अजय जाधव यांच्या आडत दुकानाच्या कुंपनाच्या आवारात पहारादेत झोपलेले होते.
दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेथे येउन मछिंद्र माने यांना मारहाण करुन त्यांच्यावर पिस्तुलने गोळी झाडून त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विशाल मछिंद्र माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.