नळदुर्ग , दि.९: 
खुदावाडी ता. तुळजापूर या  गावातील दोघा भावंडाचा  भीषण आगीच्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यु झाल्याने गावावर शोककळा पसरली. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

सचिन मदन घोडके वय २२,
अर्चना व्यकंट कवडे वय ४५  , 
रा. खुदावाडी ता. तुळजापूर असे मृत्युमुखी पडलेल्या भाऊ बहिण यांचे नावे आहेत.   

साॕनिटायझर तयार करणा-या
पुण्यातील एका केमिकल कंपनीत दोन दिवसापुर्वी भीषण आगीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यु झाला. या दुर्घटनेत खुदावाडी ता. तुळजापूर येथिल दोघा भाऊ,  बहिण यांचा समावेश आहे. हे दोघेही या कंपनीत कामावर होते. 

 सचिन घोडके हा  गेल्या काही वर्षापासुन पुणे येथे  कंपनीमध्ये कामास होता. त्याचबरोबर त्याची चुलत बहीण  अर्चना कवडे याही काम करत होत्या.

सोमवार रोजी सांयकाळी कंपनीत  आचानक आग लागली.  या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविणे आशक्य झाल्याने डीएनए चाचणीद्वारे तपासणी करुन मृतदेह नातेवाईकाना देण्यात येणार आसल्याचे सांगण्यात येत आहे.

सचिन घोडके याच्या पश्चात आई वडिल, एक भाऊ ,दोन बहिणी , असा परिवार आहे.
तर अर्चना कवडे याच्या पश्चात पती ,दोन मुले असा परिवार आहे.
 
Top