तुळजापूर दि ८ डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर नगरपरिषदेच्या सत्तेचे सूत्रधार माजी नगरसेवक विनोद गंगणे , माजी नगराध्यक्ष सौ.अर्चना गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांच्या वतीने महंत तुकोजी बुवा यांच्या शुभहस्ते ५०० कुटुंबांना अन्नधान्याची किट वितरित करण्यात आले.
तुळजापूर शहरामध्ये दहा वर्षापूर्वी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून युवक नेते विनोद गंगणे यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. आपल्या जवळ असलेल्या राजकीय कौशल्य व राजकीय व्युहरचना अत्यंत धूर्तपणे करून अत्यंत कमी वयामध्ये तुळजापूर सारख्या प्रतिष्ठित नगरपरिषदेवर अल्पावधीत ताबा मिळवला, गेल्या दहा वर्षापासून एक हाती नगरपरिषदेचा कारभार सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने करीत आहेत.
तुळजापूरच्या राजकारणातील हे गेल्या दहा वर्षातील खास वैशिष्ट्य म्हणता येईल. या सर्व यशाच्या पाठीमागे त्यांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील गरजू लोकांना केलेली मदत आणि आपल्या सर्व सहकार्यावर विश्वास टाकून त्यांच्या हातात सत्तेची दोरी देऊन तुळजापूरच्या जनतेची सेवा करण्याची दिलेली संधी हे आहे. शहराच्या दक्षिण भागात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे , उत्तर बाजूस माजी नगराध्यक्षा सौ अर्चना गंगणे यांनी या अडचणीच्या काळात लोकांना मदत चालू ठेवली आहे. संपूर्ण शहरात आपल्या कामातून आपला दबदबा निर्माण केलेला आहे.
दि. ८ जून मंगळवार रोजी महंत श्री तुकोजीबुवा यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच युवा नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे, माजी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई गंगणे, कृषी बाजार समिती सभापती विजय गंगणे , सौ.प्रिया विजय गंगणे, नारायण गवळी यांचे चिरंजीव नारायण गवळी, पूजा गंगणे , प्रिया गंगणे , रुद्र गंगणे, विहान गंगणे तसेच समस्त गंगणे परिवारच्यावतीने कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये समस्त जिजामाता नगर येथील तब्बल ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट
यामध्ये आटा ५ किलो, तांदूळ ५ किलो, २ तेलपिशवी ,१ किलो शेंगदाणे, १ किलो तूर डाळ, २ किलो साखर, मीठ इत्यादी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
गेल्या बारा वर्षांपासून दिवाळी भाऊबीज भेट, रमजान ईद भेट कोरोना आपत्ती महामारी अशा अडचणीच्या काळात " वार्ड माझा " परिवार या संकल्पनेने गंगणे परिवाराने पुढाकार घेऊन सातत्याने तुळजापूर शहर नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.