उस्मानाबाद, दि. ८
जिल्ह्यामध्ये दि. 9 व 10 जुन रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये दि. 9 आणि 10 जून रोजी 6 ग्रामीण रूगणालय व 4 उपजिल्हा रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद याठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले आहे.
उस्मानाबाद जिल्हा कोव्हॅक्सिन लसीकरण सत्रामध्ये घेतला होता, केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. जेणेकरून दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या दिवशी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस देय असणा-या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे या व्यतिरिक्त इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून गर्दी करून नये, असे अवाहन करण्यात आले आहे.