जळकोट ,दि.८ : 
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्याच्या निषेधार्थ तुळजापूर तालुक्यातील  जळकोट ‌ येथील  राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने हातात फलक घेऊन,  घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.


मोदी सरकारने पेट्रोल,डिझेल व गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत.पेट्रोलने शंभर रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ लिटर झाले आहे. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झालाआहे.या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार जळकोट काँग्रेसच्यावतीने या इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून हातात फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.



यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील,ग्रा.पं. सदस्य गजेंद्र कदम, शकंर वाडीकर,पिन्टू चुंगे, समाधान पाटील, महादेव सावंत, सुनील गंगणे, नितीन माळी,शिवराज मेगंशेट्टी, विजय यादगौडा,   प्रवीण पाटील ,विक्रम चव्हाण, राहुल चव्हाण,  बाळासाहेब कदम, काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग नोंदवला.
 
Top