काटी, दि. ८ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे येथील हनुमान मंदीरासमोरील साळुंके गल्लीत रविवारी शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून येथील सुभाष भागवतराव साळुंके यांच्या सुनबाई डॉ.सपना दत्ताजीराव साळुंके यांच्या धन्वंतरी क्लिनिकचे उद्घघाटन जेष्ठ नागरिक भागवतराव साळुंके व गुणवंतराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर येथील सुप्रसिध्द खासगी रुग्णालयातील पाच वर्षांचा जनरल प्रॅक्टीसचा अनुभव असल्याने येथील ग्रामस्थांची व विशेषतः महिला रुग्णांची सोय झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी उपस्थितांशी बोलताना डॉ. सपना साळुंके म्हणाल्या की, आजच्या काळात कोरोनासारख्या महाभयंकर आजारासह विविध आजार व्यक्तींना झडत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून अनेक नागरिकांना उपचारांवर खर्च करणे शक्य नाही. त्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांची चांगल्याप्रकारे प्रामाणिकपणे उपचार करणाच्या उद्देशाने धन्वंतरी क्लिनिकचा शुभारंभ करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. सपना साळुंके या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील सामान्य माणसाची व्यथा आणि त्याची प्रत्येक अडचण माहित आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णांच्या आजारांवर चांगले उपचार, सल्ला व औषधे देण्याचे काम याठिकाणी होणार आहे. यामुळे त्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या धन्वंतरी क्लिनिकच्या माध्यमातून ते रुग्णांचा योग्य प्रमाणिक मार्गाने चांगला उपचार करून स्वताचे नाव लौकिक करतील. यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. धन्वंतरी क्लिनिक सकाळी 9 ते दुपारी 1 व संध्याकाळी 4:30 ते 7:30 या कालावधीत नागरिकांच्या सेवेत असणार असून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आले.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक भागवतराव साळुंके, गुणवंतराव मोहिते, ॲड. भैरीनाथ साळुंके, सुभाष साळुंके, प्रदीप साळुंके, ॲड. दत्ताजी साळुंके, राजाभाऊ गाटे, सुहास साळुंके, राजाभाऊ काटकर, माजी सैनिक संतोष थिटे, दिलीप साळुंके, नागनाथ साळुंके,त्रिगुणशील साळुंके, शामराव इंगळे, गणेश अंधारे, गोपीनाथ साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.