नळदुर्ग , दि. २५ :
मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन ही नळदुर्ग मार्गे घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मनसेने पंतप्रधान याना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मुंबई ते हैदराबाद ही बुलेट ट्रेन पंढरपूर-सोलापूर मार्गे हैद्राबादला जात आहे, ही बुलेट ट्रेन सोलापूर ते नळदुर्ग मार्गे हैद्राबादला गेली तर पर्यटन व तीर्थ क्षेत्रसह उद्योगाला सोईचे होणार आहे, तसेच पर्यटन व तीर्थ क्षेत्राला चालना मिळणार आहे, कारण नळदुर्ग हे ऐतिहासिक किल्ला असलेले ठिकाण आहे, श्री.खंडोबा देवस्थान, श्री.रामतीर्थ देवस्थान,आदी स्थळांना भेट देण्यासाठी व नळदुर्ग पासून ३५ कि.मी.वर असलेल्या तुळजापूर व अक्कलकोट देवस्थानला दर्शन घेण्यासाठी नळदुर्ग मार्गे दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातून येतात , सोलापूर ते नळदुर्ग व पुढे हैदराबादला बुलेट ट्रेन नेण्यासाठी केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाला सोयीस्कर व पैशाची बचत करणारा मार्ग आहे, त्यामुळे या सोयीस्कर व फायदेशीर ठरणाऱ्या मार्गाचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व रेल्वे मंत्रालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके यांच्या स्वाक्षरी आहेत.