तुळजापूर, दि. २५ :

राज्य सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोग सदस्य म्हणून निवड झालेले यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गोविंद काळे यांचा बालाघाट शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. गोविंद काळे यांचा सत्कार केला, या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, प्रा. रमेश नन्नवरे,प्रा. जी.व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top