तुळजापूर दि २५ :
तुळजाभवानी मंदिरातील गोंधळी विनायक अंबादास मोरे यांचे वार्धक्याने तुळजापूर येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये भवानी मातेचा गोंधळ गीत गाण्यासाठी मोरे हे प्रसिध्द होते. ते गोंधळी म्हणून संबळ वादनाचे आणि गीत गायनाचे काम गेल्या ६० वर्षापासून करीत होते. जुन्या पिढीतील मोरे यांच्या निधनामुळे तुळजापुरात हळहळ व्यक्त केली जात आली.