सलगरा, दि.२५ :
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे नुकतेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यानंतर आ.पाटील यांनी जनसंवाद साधला, तसेच या वेळी सलगरा बरोबरच परिसरातील आलेल्या इतर गावांच्या प्रतिनिधींकडून त्यांच्या समस्या देखील जाणुन घेतल्या. मुलभूत गरजांपासून वंचित असणाऱ्या गावांना मदत करून त्यांच्या समस्या
सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, आमदार निधीमधून किंवा इतर जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार आपण जास्तीत जास्त कामं करू, विशेष म्हणजे विकास कामाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवून ठेवा, असंही ते युवा नेते तसेच उपसरपंच प्रशांत लोमटे यांच्याशी बोलताना म्हणाले. आणि ज्या काही समस्या होत्या त्या संबंधितांना सूचना देऊन त्या समस्या सुद्धा आ.पाटील यांनी मार्गी लावल्या.
तसेच डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलगरा येथील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय आश्रम शाळेत भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, ग्रामसेवक जि.के.पारे, माजी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, ज्ञानेश्वर बोधणे, प्रशांत मुळे, सोशल मीडिया प्रमुख योगेश कुठार, प्रा.अनिल लोमटे, ज्ञानदेव कदम, प्रविण पाटील, तात्या केदार, बळवंत गरड, अप्पू बोधणे, अनिल मुळे यांच्यासह विविध गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.