तुळजापूर, दि .२३ : डॉ. सतीश महामुनी
मराठवाड्याच्या दौऱ्याची तुळजापुरात सुरुवात
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केली मोर्चेबांधणी , निमित्त राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्क यात्रेला गुरुवारी तुळजापूर पासून सुरुवात होत असून समारोप बीड येथे ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र पासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी काळात होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणी अनुषंगाने कार्यकर्त्यांची एकत्रित मूठ बांधून निवडणुकीला सज्ज होण्यासाठी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व नावाच्या यात्रेला २४ जुन ( गुरुवार ) पासून सकाळी १० वाजता सुरू होत आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर, जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना. संजय बनसोडे, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉ. आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवन गोरे, तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, जि प सदस्य महेंद्र धुरगुडे , शहर अध्यक्ष अमर चोपदार, कार्याध्यक्ष शरद जगदाळे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण मराठवाडा मध्ये जाणारे राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व तुळजापूर नंतर उस्मानाबाद, भूम, वाशी असणार आहे. २५ जून रोजी लातूर जिल्ह्यात लातूर निलंगा येथे संपर्क होईल. २६ जुन रोजी उर्वरित लातूर व नांदेडमध्ये उदगीर अहमदपूर येथे आढावा बैठक दुपारी तीन नंतर नांदेड व लोहा येथील संपर्क होईल.
२७ जुन रोजी देगलूर मुखेड माहूर आणि हदगाव येथे संपर्क बैठका होणार आहेत. २८ जुन रोजी किनवट माहूर गड येथील बैठका व उमरखेड कळमनुरी हिंगोली येथे संपर्क होईल. २९ जुन रोजी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत येथे आढावा बैठका होणार आहेत.३०जुन रोजी परभणी जिल्ह्यात गंगाखेड पाथरी परतुर घनसांगवी व जालना या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका व संपर्क होणार आहे.
१ जुलै रोजी बदलापूर भोकरदन सिल्लोड आणि कन्नड येथे संपर्क होणार आहे रात्रीचा मुक्काम औरंगाबाद येथे होईल. २जुलै रोजी औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाची महत्त्वाची बैठक घेऊन मराठवाड्यातील जल सिंचन प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत तत्पूर्वी फुलंब्री गंगापूर वैजापूर येथे संपर्क होईल. ३ जुलै रोजी पैठण गेवराई माजलगाव आणि परळी या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी परिवार जनसंपर्क होईल. ४ जुलै रोजी परळी व आंबेजोगाई येथे संपर्क बैठका होतील, दुपारी ३ वाजता या संपूर्ण यात्रेचा समारोप बीड येथे केला जाणार आहे.
तुळजापूर येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश चोपदार व गणेश नन्नवरे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा तुळजाभवानीचे दर्शनाच्या निमित्ताने येथे होत असल्यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला फायदा होईल अशी प्रतिक्रिया दिली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आगामी काळातील विविध रचना या संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.