काटी,दि.१६ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक तथा तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष बसवणप्पा चंद्रकांत मसुते आणि सुरतगाव येथील माजी उपसरपंच विठ्ठल गुंड यांची तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर काटी येथील जुबेर शेख यांची तालुका सहसरचिटणिसपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेशानुसार मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे मार्गदर्शनानुसार व पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेऊन जनमानसातील आत्मविश्वास व शक्ती वाढवण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून कार्यक्रम राबवण्यासाठी पक्षाचा प्रसार करून संघटनात्मक कार्य करण्यासाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
याप्रसंगी जिल्हा सुरेश बिराजदार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, धैर्यशील पाटील,अमर चोपदार, शरद जगदाळे, अभय माने, गणेश नन्नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.