उस्मानाबाद ,दि.१६: 
विविध मागण्यासाठी मंगळवार दि. 22  जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासोर घंटानाद आदोलना करण्याबाबत 
ओ बी सी राजकीय आरक्षण समिती उस्मानाबाद व बहुजन योध्दा सामाजिक संघटनाच्या वतीने वि  जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.


 स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओ बी सी चे राजकीय आरक्षण राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णानुसार कारवाई करावी,  इतर मागासवर्गीय व  मागासवर्गीय  आधिकारी ,कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागु करावे,  ओ बी सी ची जातनिहाय जणगणना करण्यात यावी , जोपर्यंत  मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत  राज्यामध्ये कोणत्याही जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका घेण्यात येऊ नये ,
 विधान सभेत  व लोकसभेत ओ बी सी ला आरक्षण देण्यात यावे, आदी
 प्रमुख मागण्या आहेत.



 ओ बी सी आरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, सचिव रवि कोरे आळणीकर, कार्याध्यक्ष महादेव माळी,सहसचिव शिवानंद कथले,कोषाध्यक्ष इंद्रजित देवकते,संघटक सतिश कदम, सहसंघटक सतिश लोंढे,प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे,अजित माळी, सोशल मिडीया प्रमुख मुकेश नायगावकर,प्रमुख सल्लागार अँड खंडेराव चौरे,पिराजी मंजुळे,पांडुरंग लाटे,दाजी पवार,अजय यादव ज्ञानेश्वर पंडीत,नामदेव वाघमारे,बंटी बेगमपुरे, प्रमु़ख मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, नितिन शेरखाने,आबासाहेब खोत,डी एन. कोळी यांच्यासह ओ बी सी समाज बांधवांची उपस्थिती होती.
 
Top