उस्मानाबाद,दि.१६ : 
मंगळवार  रोजी उस्मानाबाद पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (समतादूत प्रकल्प उस्मानाबाद) अंतर्गत  बार्टीचे  महासंचालक धम्मजोती गजभिये  यांच्या आदेशानुसार संपुर्ण राज्यभर पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपणाचे आयोजन केले आहे . त्याची अंमलबजावणी  उस्मानाबाद पोलिस अधिक्षक  राजतिलक रोशन यांच्या  हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.  

यावेळी राखीव पोलिस निरीक्षक शांताराम वाघमोडे  , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  पानसे  , बार्टीचे प्रकल्प  अधिकारी तुषार कदम, समतादूत रमेश नरवडे , गोविंद लोमटे,  सुहास वाघमारे , नागेश फुलसुंदर, किरण चिंचोले, गणेश मोटे , अर्चना रणदिवे आदीसह इतर कर्मचारी उपस्थित होते .
 
Top