उस्मानाबाद ,दि.३: 

 उस्मानाबाद पोलीसांनी काल बुधवार दि. 02 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 6 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 6 गुन्हे नोंदवले आहेत.

(1) भास्कर व्यंकटराव भोसले, रा. धाकटेवाडी, ता. उमरगा हे तलमोड शिवारातील आपल्या ‘चरण हॉटेल’ मध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या 115 बाटल्या (किं.अं. 8,212 ₹) बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) श्रीनिवास शंकरराव कणकधर, रा. सालेगाव, ता. लोहारा हे कोराळ शिवारातील एका पत्रा शेडमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 1,280₹) बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) अक्षय रामलिंग चौधरी, रा. शिराळा, ता. बार्शी हे मलकापुर फाटा येथील दहिफळ रस्त्याने हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीझेड 2198 वरुन देशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 2,880 ₹) अवैधपणे वाहून नेत असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) पपीता रंजीत काळे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद या आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये 60 लि. गावठी दारु (किं.अं. 3,600 ₹) बाळगलेल्या असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

(5) भुजंग महिपती गायकवाड, रा. जेजला, ता. भुम हे गावातील जि.प. शाळेसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 42 बाटल्या (किं.अं. 2,184 ₹) बाळगलेले असलेले आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(6) रेखा मधु काळे, रा. साठे चौक, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 800 ₹) बाळगलेल्या असलेल्या उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

 
Top