उस्मानाबाद, दि.७:
उस्मानाबाद जिल्ह्यात लीसांनी काल रविवार दि. 06 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 6 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 6 गुन्हे नोंदवले आहेत.
(1) शाम कोथिंबिरे, रा. उमरगा हे आरोग्य नगर, उमरगा येथील स्मशान भुमीजवळ तीन कॅनमध्ये 13 लि. गावठी दारु (किं.अं. 930 ₹) बाळगलेले तर वसंत गोपा राठोड, रा. सेवानगर तांडा, कदेर, ता. उमरगा हे याच दिवशी राहत्या वस्तीवर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 950 ₹) बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
(2) अविनाश घोरपडे, रा. गारभवाणी, परंडा हे परंडा येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 1,080 ₹) बाळगलेले असलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.
(3) बालाजी पवार, रा. बोरगाव (रा.), ता. उस्मानाबाद हे गावातील चिखली रस्त्यावरील पुलाजवळ अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) बाळगलेले असलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
(4) दुष्यंत सिरसट, रा. पिंपळा (बु.), ता. तुळजापूर हे आपल्या राहत्या घरासमोरील जागेत 15 लि. गावठी दारु (किं.अं. 980 ₹) बाळगलेले तर बायडाबाई डोलारे, रा. सावरगाव (काटी), ता. तुळजापूर या राहत्या गल्लीत 15 लि. गावठी दारु (किं.अं. 850 ₹) बाळगलेल्या असलेल्या तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.