उस्मानाबाद,दि.७

 स्थानिक गुन्हे शाखा: कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथील एका आडत दुकानासमोर रखवालदार -मछिंद्र छगन काळे, वय 45 वर्षे, रा. फरीदनगर, कळंब हे दि. 05 जून रोजी 02.04 वा. सु. पहारा देत झोपले असतांना अज्ञात पुरुषाने मछिंद्र माने यांना मारहाण करुन पिस्तुलने गोळी झाडून त्यांचा खून केला होता. हा प्रकार त्या आडत दुकानाच्या सीसीटीव्हीत धुसर स्वरुपात कैद झाला होता. 



स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पाहेकॉ- काझी, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, अविनाश मारलापल्ले, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने हे सीसीटीव्ही छायाचित्रण पुन:पुन्हा पाहुन मारेकऱ्याच्या शरिरयष्टीवरुन तपासाची दिशा निश्चित केली. एकंदरीत तपासादरम्यान हा गुन्हा 1)शाम राजाभाऊ पवार उर्फ बॉयलर, वय 23 वर्षे, रा. केज 2)गणेश सुबराव पवार, वय 19 वर्षे, रा. पारधी पिढी, कळंब यांनी केला असल्याचे निदर्शनास आले. यावर पथकाने त्या दोघांना काल दि. 06 जून रोजी म्हणजे खूनानंतर अवघ्या 36 तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन जेरबंद केले असून पुढील तपास कळंब पो.ठा. चे सपोनि- श्री. अशोक पवार हे करत आहेत.  

 
Top