लोहारा,दि.७ :
तालुक्यातील नागराळ येथील पोलीस पाटील तथा पत्रकार तानाजी माटे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती कामगार संघटनेच्यावतीने संघटनेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

छत्रपती कामगार संघटना प्रत्येक वर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा नेहमीच सत्कार करुन सन्मानित करण्यात येते. तानाजी माटे यांचे समाज उपयोगी उतकृष्ट  कार्य पाहुन छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. व तसेच पत्रकार अशोक दुबे यांचाही संघटनेचे वतीने सन्मान करण्यात आला. 


यावेळी  सत्कार मुर्ती तानाजी माटे, पत्रकार अशोक दुबे, छत्रपती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड, संगटनेचे उपाध्यक्ष बालाजी माटे, सचिव तिम्मा माने. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अभिमन्यू कुसळकर, लोहारा, उमरगा विधानसभा महासचिव बालाजी चव्हाण तालुका कार्याध्यक्ष दीपक तावडे, उपाध्यक्ष किशोर गायकवाड, यांच्यासह पदाधिकारी, सहकारी मित्र,नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक निकिता गायकवाड, कार्यकर्ते, महीला पदाधिकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष बालाजी माटे व सुत्रसंचालन सचीव तिम्मा माने यांनी केले. तर आभार लोहारा, उमरगा विधानसभा महासचिव बालाजी चव्हाण यांनी मानले.
 
Top