तुळजापूर दि ८ डॉ. सतीश महामुनी

मागील चार दिवसांमध्ये लग्न तिथी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विवाह झालेल्या दाम्पत्यांनी तीर्थक्षेत्र  तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आगमन केल्याचे चित्र दिसून आले, मंदिर बंद असल्यामुळे या सर्व नव दाम्पत्यांनी राजे शहाजी महाद्वार यापासून मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी  शिथील  केल्यानंतर खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाचे बस वाहतूक सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासून लग्न समारंभ झाल्यानंतर कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवदाम्पत्य व त्यांचे मोजके कुटुंब शहरामध्ये येत असताना दिसून आले.

आलेले सर्व लोक  चेहऱ्यावर मास्क लावून आले होते. त्यांना राजे शहाजी महाद्वार येथून स्थानिक पुजारी बांधवांनी पाद्यपूजा करून आशीर्वाद दिले. या संकट काळामध्ये सर्व अडचणीवर मात करून लग्न समारंभ झाल्यानंतर कुलदेवतेचे दर्शन करण्याच्या परंपरेनुसार हे नवदांपत्य येथे आलेले होते. सामाजिक अंतर व मास्क याचा सर्वांनी उपयोग केलेले चित्र   दिसून आले.
 
Top