इटकळ , दि. २१ :
पोलीसांच्या सतर्कतेमुळे गाडी लुटण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला.अंधाराचा फायदा घेत चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाले.ही घटना दि.२१ जुन रोजी पहाटे २ ते ३ वाजणाच्या दरम्यान हैद्राबाद सोलापूर महामार्गावर धनगरवाडी ता. तुळजापूर शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात , वाहनचालकात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक राजजतिलक रोशन यानी भेट दिली आहे.
हैदराबादहुन किंमती साहित्याचे पार्सल घेऊन एम. एच. १४ जे ए ७७९९ हे कन्टेनर नळदुर्ग मार्गे मुंबईकडे जात असताना महामार्गावरील फुलवाडी ता.तुळजापूर येथिल टोलनाक्याच्या पुढे धनगरवाडी शिवारात अज्ञात चार चोरट्यांनी हातामध्ये टामी घेऊन गाडी आडवुन चालकाला मारहाण करु लागले. ही घटना पाटीमागुन येणा-या वाहनचालकाने इटकळ पोलीस चौकीत सांगितले.
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, सपोनिसुधीर मोटे, अतुल साळुंखे लक्ष्मण शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी विरोधी दिशेने येणा-या वाहनांची चाहुल लागताच चोरट्यांनी आंधाराचा फायदा घेत शेतातील ऊसामधुन पसार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उस्मानाबाद येथील श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
धनगरवाडी चोरीच्या प्रकरणी २७ हजार रुपये साहित्य चोरीचा गुन्हा नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता घटनास्थळास भेट देवुन पाहणी केली.
फिर्यादी गुलफाम महेबुब शेख चालक राहणार नजीर पिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर ,
आयशर टेंम्पो क्र. एम. एच 14 जे. एल. 7799 फ्लीपकार्ट कंपनीचे पार्सल घेवून हैद्राबाद येथून मुंबईकडे जात असताना अनोळाखी चार इसमांनी चाकुचा धाक दाखवून टेम्पो उसाच्या बांधावर नेवून टेम्पोचे शटर लॉक तोडून आतील फ्लीपकार्ट कंपनीचे विविध वस्तुचे पार्सल एकुण 27 हजार 58 रूपयच्या वस्तू जबरीने चोरून नेले.