जळकोट,दि.१९ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे शिवसेनेच्या पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रांगणात ५५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेला ५५ वर्ष झाल्याने या स्थापना दिनानिमित्त ५५ रोपांचे वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्ष बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, अनिल छत्रे,सुनील छत्रे,महादेव सावंत,बाळु जाधव,बसवराज यादगौडा, दत्ता पांचाळ, विठ्ठल कटोरे, अर्जुन सावंत, मल्लू डांगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.