मुरुम, दि. १९ :
वाचन करा आणि समृद्ध व्हा असे गौरवोद्गार काढणारे पी.एन.पाणीक्कर तथा पिल्लई यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून सबंध देशामध्ये हा दिवस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने आयोजित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालयात कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस शनिवारी (ता.१९) रोजी ग्रंथपाल डॉ.राजकुमार देवशेट्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्रिवार अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.महेश मोटे, डॉ.किरण राजपूत, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.संध्या डांगे, डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.सुजित मटकरी, डॉ.सुशिल मठपती, डॉ.राम बजगिरे, डॉ.राजू शेख, डॉ.जयश्री सोमवंशी, प्रा.अशोक बावगे, प्रा.भूषण पाताळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भालचंद्र टाचले यांनी आजपासून ते २५ जून पर्यंत वाचन सप्ताह महाविद्यालयात साजरा करण्यात येणार आहे.
एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. एक पण एखाद्याचे आयुष्य बदलू शकते आणि एक वाक्य एखाद्याचे आयुष्याचे ध्येय ठरवू शकते. एवढी ताकत वाचनात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजकुमार देवशेट्टे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी तर आभार डॉ. सुशिल मठपती यांनी मानले.