उस्मानाबाद ,दि.१९ 

पोलीस ठाणे, परंडा: धनंजय अंकुश गवारे व मुज्जोद्दीन शम्मोद्दीन मुजावर, दोघे रा. जवळा (नि.), ता. परंडा या दोघांनी दि. 17 जून रोजी 18.35 वा. सु. गावातील आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ‘डीजी कन्ट्रक्शन एण्ड ईलेक्ट्रिकल्स’ व ‘मुजावर चिकन’ हे दुकान व्यवसायास चालू ठेउन अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top