उस्मानाबाद ,दि.१०
पोलीस ठाणे, लोहारा: अल्लाबक्ष यासीन सुंभकर, रा. लोहारा हे दि. 09 जून रोजी आपल्या राहत्या घरासमोर होते. यावेळी गावकरी- फकरुद्दीन भोंगळे, सुरैया भोंगळे, मुस्कान भोंगळे, समीर भोंगळे अशा चौघांनी तेथे जाउन, “तु आम्हाला कोणत्याही कार्यक्रमास का बोलावत नाहीस.” अशी कुरापत नमूद चौघांनी काढून अल्लाबक्ष सुंभकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुकक्यांनी, काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अल्लाबक्ष सुंभकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.