तुळजापूर, दि. २४ :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी महाविद्यालयातील अनुवैजिक व दूरसंचार विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एन.डी.पेरगाड यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.एन.डी.पेरगाड हे महाविद्यालयात गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असून यापुर्वी त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिलेले आहे. तुळजाभवानी संस्थान कडून चालवण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे आभिनंदन होत आहे.