कळंब दि. २७ :
क्रांतीयोद्धा सोमनाथभाऊ कांबळे यांच्या जयंतीनिमित्त डिकसळ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
चाळीस युवकांनी रक्तदान करून चाळीसावी जयंती केली साजरी सुरुवातीस सोमनाथभाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून आणि ध्वजारोहण करण्यात आले. या शिबीरामध्ये चाळीस युवकांनी रक्तदान केले.
रक्तदात्यास सोमनाथ भाऊंचे छायाचित्र असलेली ट्राफी देण्यात आली. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या विदर्भ अध्यक्ष भारती कांबळे, शिबिराचे आयोजक तथा लहुजी शक्ती सेना कोअर कमिटी सदस्य बालाजी भाऊ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मारुती क्षीरसागर, कळंब तालुकाप्रमुख पांडुरंग कदम, वाशी तालकाध्यक्ष अमोल क्षिरसागर, कळंब तालुका उपाध्यक्ष चौ सुदेश शिंदे, विकास गायकवाड, रनजित पाटोळे, अनिल सिरसट, भारत सिरसट, शिवाजी ऊकीरंडे शुभम लोखंडे, आशिष शिंदे, जयंती कमेटी अध्यक्ष किरन गायकवाड ऊपाध्यक्ष धनंजय मोरे, दिपक पाटोळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.