नळदुर्ग , दि.१४:
शिवसेनेचे खासदार ओमराजे निबांळकर व आमदार कैलास पाटील यानी रविवार दि.१३ जुन रोजी दुपारी २ वाजता तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे नवगिरे कुंबियाची भेट घेवुन सांत्वन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचे वडील प्रकाशराव नवगिरे यांचे नुकतेच निधन झाल्याने
नवगिरे कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी नवगिरे यांच्या जळकोट ता.तुळजापूर येथील निवासस्थानी भेट देऊन विचारपूस केली व कुटूंबियांचे सांत्वन करून सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रशांत नवगिरे, आण्णाराव नवगिरे, प्रा.पुरुषोत्तम नवगिरे, गिरीश नवगिरे,श्रीकांत नवगिरे, नंदकिशोर नवगिरे, पंकज नवगिरे यांच्यासह नवगिरे कुटूंबीय व ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, बसवराज भोगे आदी उपस्थित होते.